संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Friday, November 12, 2010

हिन्दवी-स्वराज्याच पाहिलं पान

सूर्याची किरणे गारव्याला होती जाळत, शिवनेरीवर भगवाही होता खेळत,
येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहुल,
शिवजन्माच पडणार होत पाहिलं मराठी पाउल ........

मराठ्यांचा प्रत्येक अश्रू, जिजाऊन साठवला होता,
आई भवानीस तेच अश्रू देऊन, पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता .....
मंदिर थरारली,शिवनेरीवर तोफ कडाडली, वाऱ्याची कोवळी झुळूक दऱ्या खोऱ्यात दरवळली
जिजाऊपोटी मराठ्यांचा राजा अवतरला, सांगत मुकी पाखर हि किलबिलली .........


नगरा वाजला शाही साज चढला, डंका डोंगराआड सांगत सुटला,
आता सह्याद्रीवर भगवा फडकणार, मराठ्याची तलवार शत्रूवर धडकणार..........
पाहिलं पान शिवजन्मान लिहल गेल होतं,
हिरव्या दगडावर आता भगव रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत.....!

- "जय भवानी, जय शिवाजी"